Share

उत्तर मुंबई मधून कॉंग्रेस कडून लढणार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांंन बरोबरच सिने-सृष्टीमधील कलाकारांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अनेक सिने-कलाकार यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मोसमात राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या बाजूनं मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उर्मिला मातोंडकरांचा लवकरच कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार असून उत्तर मुंबईतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष अभिनेत्यांच्या प्रसिद्धीचे परिवर्तन मतांमध्ये करून घेणार आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देवून भाजपचे गोपाळ शेट्टी यांना तगडे आव्हान उभे करणार आहे.

दरम्यान उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी हे धडाडीचे उमेदवार असल्याने त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न कॉंग्रेसला पडला होता. पण आता उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं देखील  चर्चेत होते. पण अखेर उर्मिला मातोंडकर यांनी बाजी मारल्याच दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!