Share

उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तिने सोशल मीडियावर ट्विटद्वारे दिली आहे. काही दिवसापूर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता उर्मिलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

उर्मिला मातोंडकरने ट्विट करत म्हटले की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आता होम क्वारंटाईनमध्ये स्वतःला आयसोलेटेड केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करते की त्यांनी ताबडतोब स्वतःची चाचणी करावी. दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी,’ असे म्हणत तिने काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. ‘रंगली’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यावेळी त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक करण्यात आले. मात्र ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. सध्या उर्मिला राजकारणात सक्रिय असून काँग्रेसमधून राजकारणाची त्यांनी सुरवात केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!