औरंगाबाद : यूपीएससी विभागाच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ :३० ते ११:३० तर दुपारी २:३० ते ४:३० या दोन सत्रात परिक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागाच्या वतीने देण्यात आली.
नागरिसेवा पूर्व परीक्षेसाठी एकूण १४ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा ही देवगिरी महाविद्यालय, मुकुल मंदिर शाळा, एमआयटी महाविद्यालय, वेणूताई चव्हाण शाळेसह एकूण ४७ केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला एकूण १ हजार ९८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा रुग्णांचा आकडा सध्या कमी झाला असला तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही.
त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. सदरील परीक्षेला विद्यार्थ्यांना मास्क लावूनच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. तसेच सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी परीक्षा विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेला येताना मास्क लावून तसेच वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर राहावे. असेही परीक्षा विभागाच्या वतीने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील’, प्रवीण दरेकरांचा घणाघात
- ‘बसस्थानकाचे राहिलेले काम पुर्ण करा’, हिंगोलीत प्रहार जनशक्ती पक्षाचे डफडे बजाओ आंदोलन
- ‘…तेव्हा तो आंदोलनाला बसला होता’, अश्विन-मॉर्गनच्या वादावर सेहवागची प्रतिक्रिया
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- महापुराचे कारण ‘जलयुक्त शिवार’, पर्यावरण तज्ञांनी दाखवले फडणविसांकडे बोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

