Share

‘मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील’, प्रवीण दरेकरांचा घणाघात

Published On: 

पुणे : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातल्या मराठवाड्यासह विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या खरीप पिकाचे नुकसान झाले असून जीवित आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यावरुन आता विरोधी पक्षाने सरकारवर निशाना साधला आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते, अतिवृष्टी होऊन एवढे दिवस उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. आता घोषणा पुरे झाल्या तातडीने मदत करावी. असे दरेकर म्हणाले.

आमची मागणी आहे, तत्काळ दुष्काळ जाहीर करावा. वडेट्टीवारांनी सांगितले होते की दोन दिवसांत मदत करु अद्याप मदत मिळाली नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. अशा वेळी मंत्र्यांचा जल्लोशात सत्कार करणे योग्य नाही. काही झाले की केंद्रावर ढकलायचे हे नेहमीचेच आहे. केंद्राने आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे. सत्तेत गेल्यावर शिवसेनेची भूमिका बदलली आहे. आधी विमा कंपन्यांची कार्यालय फोडणारी सेना आता कुठे गेली? असा प्रश्न उपस्थित करत आता आक्रमक होण्याची गरज आहे असेही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!