मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराची कारणे शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवाराकडे बोट दाखवत आहेत. जलयुक्तच्या कामामुळे नद्यांशी मोठ्या प्रमाणात छेडछाड केल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे.
देऊळगावकर म्हणाले, जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. त्यावेळेलाच महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, प्रदीप पुरंदरे, विजय बोराडे यांनी सांगितले होते, तुम्ही नदीशी छेडछाड करु नका. आता त्याची फळं आपण भोगत आहोत. आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीने केले जाते. सर्व कामं बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे त्यांच्या मनमानी पद्धतीने काम केले गेले. त्यामध्ये तज्ज्ञांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे त्याची ही परिणीती आहे. असे मत पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत जलतज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणतात, मराठवाड्यात आलेला पूर जलयुक्त शिवार योजनेमुळे आला असे म्हणता येणार नाही, मात्र पूर येण्याला जलयुक्त शिवार योजना हे एक कारण आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामे चुकीच्या पद्धतीने झाली. अतिखोलीकरण ,रुंदीकरण यामुळे कामात तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणावर झाल्या. मी आधीपासूनच या कामांवर आक्षेप घेतला होता. मात्र सरकारने केलेल्या चुकांमुळे ही परिस्थिती उद्भवली, असे प्रदीप पुरंदरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- गंगापूर तालुक्यात पावसाने दाणादाण, नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट!
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

