अबुधाबी : मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 3 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह कोलकाताने 10 गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच प्ले ऑफच्या आशाही कायम राखल्या आहेत. या सामन्यात केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गन आणि दिल्लीचा अनुभवी बॉलर आर. अश्विन यांच्यात भर मैदानात वाद पाहायला मिळाला. मैदानात झालेला हा वाद आता क्रिकेट विश्वातील चर्चेचा मुद्दा बनला आहे. या वादाचं नेमकं कारण काय होत याचा खुलासा सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना कार्तिकनं केला.
यावेळी कार्तिक सांगितलं दिल्लीची बॅटींग सुरू असताना राहुल त्रिपाठीनं थ्रो फेकला होता. तो थ्रो दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला लागला आणि बॉल दूर गेला. याच संधीचा फायदा घेत अश्विननं रन काढण्याचा प्रयत्न केला. मॉर्गनला हे आवडलं नाही की बॉल चुकून बॅट्समनच्या बॅटला लागला असेल तर खेळ भावनेचा आदर करुन त्यावर रन काढू नये, अशी मॉर्गनची अपेक्षा होती. असं कार्तिकनं स्पष्टीकरण दिलं.
यावरच आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. ’14 जुलै 2019 ला अखेरच्या ओव्हरमध्ये रन काढत असताना बेन स्टोक्सच्या बॅटला बॉल लागला. यानंतर मॉर्गनने लॉर्ड्सच्या बाहेर धरणं धरलं आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे न्यूझीलंडचा विजय झाला. मोठे आले पसंत न करणारे’, असं ट्वीट सेहवागने केलं.
On July 14th , 2019 when it ricocheted of Ben Stokes bat in the final over, Mr Morgan sat on a Dharna outside Lord’s and refused to hold the World cup trophy and New Zealand won. Haina ? Bade aaye, ‘doesn’t appreciate’ waale ???? pic.twitter.com/bTZuzfIY4S
— Virender Sehwag (@virendersehwag) September 29, 2021
यावेळी सेहवागने आठवण करून दिलेली ही घटना 2019 वर्ल्ड कप फायनलची आहे. या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या फिल्डरने केलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून बाऊंड्री लाईनवर गेला, त्याचा इंग्लंडला फायदा झाला आणि इंग्लंडला अधिक रन मिळाले. फायनलचा हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री मारलेल्या इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

