Share

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात अव्वल

Published On: 

नवी दिल्ली : काही वेळापूर्वी भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. एकूण 761 उमेदवारांना या निकालामधून नियुक्ती देण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वी रँक मिळवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

निकालानुसार, टॉप 25 उमेदवारांमध्ये 13 मुले आणि 12 मुलींचा समावेश आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये 25 व्यक्ती अपंगत्व असलेल्या (07 ऑर्थोपेडिकली अपंग, 04 दृष्टिहीन आव्हान, 10 श्रवणदोष आणि 04 अनेक अपंग) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून विनायक कारभारी याला ३७ वा रँक मिळाला आहे.आयोगातर्फे 180 आयएएस, 36 आयएफस, 200 आयपीएस, सेंट्रल सर्व्हिस ग्रप ए 302, ग्रुप बी सर्व्हिस 118 अशा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 836 नुयक्त्या केल्या जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!