मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणांवर भाष्य केलं होतं. ‘महिलांवर अत्याचार व्हावा असं कोणत्याच सरकारला वाटत नसतं. रावणालाही तसं वाटत नसेल. म्हणूनच रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेले तेव्हा तिच्यावर अत्याचार केला नाही. तिला सन्मानपूर्वक अशोक वनात ठेवले,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसले आहेत…
यांना रावणाबाबत ममत्व असणे स्वाभाविकच नाही का? pic.twitter.com/yyBaDaG4Ry— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2021
संजय राऊत यांच्या या विधानाचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसले आहेत…यांना रावणाबाबत ममत्व असणे स्वाभाविकच नाही का?’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार

