Share

सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली

Published On: 

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना सोमवारी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, सोमय्या जेव्हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूरला निघण्यासाठी बाहेर पडणार होते, त्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता . त्यांना घरातून बाहेर देखील पडू देण्यात येत नव्हतं. अखेर मोठा संघर्ष आणि नाट्यमय घडामोडीनंतर ते महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरची रवाना झाले मात्र त्यांना जिल्हाबंदी असल्याने कराड येथे उतरून माघारी परतावं लागलं. यावेळी सोमय्यांसोबत पोलिसांनी केलेल्या वर्तनावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती.

आता उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘किरीट सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. कुणाला काही पाहणी करायची असेल तर ती करु द्यावी असं देखील पवार यांनी म्हटलं. यासोबतच, सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत केलेल्या आरोपांवर देखील पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

‘कुणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करु. त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन घेऊ द्या. मला त्यावर काही म्हणायचं नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!