पुणे : यंदा देखील साधेपणाने गणोशोत्सवाची सांगता झाली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने यंदा सर्व सण-उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्व प्रशासनांनी केले होते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचे वातावरण होते. पुणे शहरात विविध बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांसह पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढेल अशी भीती व्यक्त केली जात होती.
दरम्यान, गणेशोत्सव काळात वा उत्सव संपल्यानंतर आतापर्यंत तरी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद नसून उलट पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची आढावा बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. तर, पुणेकरांना आणखी मोठा दिलासा देण्याबाबत देखील त्यांनी संकेत दिले आहेत.
‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडची कोरोना परिस्थिती बरी आहे. येत्या एक तारखेला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिथिलता देण्याबाबत बैठक घेणार आहे. मात्र मास्क वापरणे बंधनकारक राहील,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासोबतच, ‘पुणे जिल्ह्यात लसीचा एक कोटीचा टप्प्या पार झालाय. जिल्ह्यातील 83 टक्क्यांहून अधिक लोकांना पहिला तर 44 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला,’ अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत – भातखळकर
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

