Share

‘…तर राजकारणात अपमानाला स्थान आहे का?’ अमरिंदर सिंगचा थेट काँग्रेस हायकमांडला सवाल

Published On: 

पंजाब : मागील काही दिवसांपासून पंजाबमधील राजकीय वातावरण चिघळतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरु झाला आहे. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. ‘जर राजकारणात रागाला स्थान नसेल तर मग अपमानाला आहे का?’ असा सवाल अमरिंदर सिंग यांनी हायकमांडला केला आहे.

अमरिंदर सिंग हे सातत्याने संकेत देत आहेत की येणाऱ्या काळात ते काही मोठी पावले उचलू शकतात. यामुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अमरिंदर सिंग यांच्या आक्रमक स्वभावामुळे अगदी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासूनच काँग्रेसमध्ये चिंताजनक वातावरण असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सल्ला देत म्हणाल्या आहेत की,’राजकारणात राग, द्वेष, एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर टिप्पणी करणं आणि त्याच्यावर सूड उगवणं या सगळ्या गोंष्टींसाठी कोणतीही जागा नाही. मला आशा आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग नक्कीच समजूतदारपणा दाखवून आपल्या शब्दांचा पुनर्विचार करतील’ असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!