Share

Good News : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन

Published On: 

मुंबई : छोटया पडद्यावरील लोकप्रिय होस्ट आणि गायक आदित्य नारायण (Aditya Narayan ) च्या घरी नव्या पाहुण्याचे लवकरच आगमन होणार आहे. त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) गरोदर असून आदित्यने स्वत: ही गुडन्यूज (Good New) चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दरम्यान आदित्य नारायणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर(instagram) पत्नी श्वेतासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्वेता बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. ‘मी आणि श्वेता लवकरच आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत..,’ असं आदित्यने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अलीकडे एका मुलाखतीत आदित्यने पत्नीच्या प्रेग्नंसीचा खुलासा केला होता. मुलगी हवी की मुलगा असं विचारलं असता, मुलगी झाली तर मला अधिक आनंद होईल. कारण मुली बाबाच्या अगदी जवळ आणि लाडक्या असतात, असं आदित्यने व्यक्त केले.

गायक आदित्य आणि श्वेता १ डिसेंबर २०२० रोजी विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट २०१० मध्ये ‘शापित’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री होऊन दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे लग्नाआधी दहा वर्ष दोघंही एकमेकांना डेट करत होते. मात्र जगापासून दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती.

https://www.instagram.com/p/CZGclahvlT4/?utm_source=ig_web_copy_link

श्वेताने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. श्वेता २००० मध्ये टीव्ही सीरियल ‘बाबुल की दुल्हनिया’ (Baabul ki Dulhania) मध्ये दिसली होती. तसेच २००१ मध्ये शगुन आणि ‘देखा मगर प्यार से’ या मालिकेमध्ये मध्ये दिसली होती. श्वेताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून फिल्मी जगात पाऊल ठेवलं. श्वेता शेवटची २०१० मध्ये आलेल्या बॉलिवूड हॉरर चित्रपट ‘शापित’मध्ये आदित्य नारायणसोबत शेवटची झळकली होती.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!