मुंबई – राज्यातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं राज्य शासनानं काल जाहीर केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली; त्यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
या नव्या निर्बंधानुसार राज्यात आजपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असेल; तर दिवसा जमावबंदी लागू असेल. सर्व मॉल्स, रेस्टॉरंटस बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यपदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालयं ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील.
दरम्यान, खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर दर सप्ताहांती म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संपूर्ण टाळेबंदी असेल असं शासनातर्फे सांगण्यात आलं. हे सर्व निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.
दरम्यान,राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह आहे. ती रोखण्यासाठी जनतेनं राज्य सरकारला सहकार्य करावं. या संदर्भात आमचाही राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा राहील, असं विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं नव्या मानक कार्य प्रणालीबाबत लवकरंच जनतेचं प्रबोधन करावं, तसंच वीज तोडणी थांबवावी आणि गरीब आणि मध्यम वर्ग तग धरू शकतील एवढी तरी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारने मध्यम मार्ग काढला; भाजप नेत्याने केले निर्णयाचे स्वागत
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !


