🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात शनिवारी ४९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने राज्याची स्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे.
राज्यात फक्त शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. उद्यापासून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले आहे. ‘संपूर्ण लॉकडाऊनला सामान्य जनतेसह भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचाही विरोध होता. त्यामुळे, पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारने मध्यम मार्ग काढला, हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे. परंतु सरकारने जनतेची काळजी घेऊन व्यवस्थेतील सक्षमपणा पाहणे देखील आवश्यक आहे,’ असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.
पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारने मध्यम मार्ग काढला, हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे. परंतु सरकारने जनतेची काळजी घेऊन व्यवस्थेतील सक्षमपणा पाहणे देखील आवश्यक आहे. @CMOMaharashtra @rajeshtope11 @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra pic.twitter.com/nchGR1iMUJ
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- राज्यात कडक निर्बंध, आता पंढरपूर पोटनिवडणुकीचे काय ? अजित पवार म्हणाले…
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
