Share

मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली

Published On: 

पंढरपूर : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात असतानाच पंढरपूर मध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या प्रचारसभांचा धुरळा उडाला आहे.

एका बाजूला राज्य मोठ्या संकटाशी सामना करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधताना सांगितलं आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाचा पुरता विसर पडल्याचं आता समोर येतंय.

पंढरपूरची पोटनिवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली असून प्रचार सभांना देखील वेग आला आहे. एकीकडे राज्यात कोरोना वाढत असल्याने निर्बंध लावण्यात येत असताना राजकीय पक्षांना मात्र याचं भान नसल्याचं समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेला सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणे अशा कोरोना प्रतिबंधक नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

जयंत पाटलांच्या या दौऱ्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. इतकेच नाही तर ज्या प्रचार सभेत त्यांनी भाषण ठोकलं, त्या सभेत शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित असल्याचं फोटो वरून समजत आहे. लग्न, अंत्यसंस्कार यावर ठराविक व्यक्तींनाच जाण्यास परवानगी आहे. तर, मागील महिन्यातच उद्धव ठाकरेंनी राजकीय, धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. असं असताना पंढरपुरात राजकीय पक्षांना सूट आहे ? माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे जमलेल्या जनसमुदायामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. हे उदाहरण समोर असतानाही मंत्र्यांना त्याचा विसर पडलाय का ? असे सवाल उपस्थित होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेआधी या जबाबदार मंत्र्यांना यावर घालायला हवा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!