Share

अजितदादांच्या सूचनेनंतर सुप्रिया सुळे यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला असून राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, काल राज्यात तब्बल राज्यात आज ४० हजार ४१४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, काल नवीन १७ हजार ८७४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आता पर्यंत एकूण एकूण 23 लाख 32 हजार 453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 3 लाख 25 हजार 901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यासोबतच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत असून आता 85.95% इतके झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी जमून कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी सुळे यांनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपण सर्वजनच योग्य ती खबरदारी घेत आहोत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सुचनेनुसार आपण आपले मतदारसंघ आणि इतर ठिकाणचे सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत, असे सुळे यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!