Share

सलामी जोडी रोहित-शिखरची कमाल कामगिरी ; हेडन-गिलक्रिस्टला पण टाकले मागे

Published On: 

पुणे : शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने एक विशेष कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात रोहित-धवनने पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. वनडेमध्ये सलामीवीर म्हणून या दोघांची ही 17 वी शतकी भागीदारी आहे. रोहित-धवनने या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या हेडन-गिलक्रिस्ट या जोडीला मागे सोडले आहे.

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने पुन्हा टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा  (37) आणि शिखर धवन ( 67) यांनी 14.4 षटकांत 103 धावांची भर घालून भारताला शानदार सुरुवात करून दिली. रोहित-धवनच्या सलामीच्या जोडीने आता 110 डावांमध्ये 4978 धावा केल्या आहेत. यावेळी, दोघांची 17 शतके आणि 15 अर्धशतकी भागीदारी आहे.

मॅथ्यू हेडन आणि अ‍ॅडम गिलक्रिस्ट या जोडीने 114 डावात 48.39 च्या सरासरीने 5372 धावा केल्या. या दरम्यान, हेडन-गिलख्रिस्टने 16 शतके आणि 29 अर्धशतकांची भागीदारी केली. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरच्या सलामीच्या जोडीने वनडेमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी केली आहे. तेंडुलकर-गांगुलीने 136 डावात 49.32 च्या सरासरीने 6609 धावा रेकॉर्ड केल्या आहेत. यादरम्यान दोघांची 21 शतके आणि 23 अर्धशतकी भागीदारी होती.

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीने एकूण एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी साधणारी ही सातवी जोडी ठरली आहे. आता दोघांनीही 112 डावात 45.25 च्या सरासरीने 5,023 धावा जोडल्या आहेत.

वनडे मालिकेत 5000+ रानांची पार्टनरशिप:

8227  सचिन तेंदुलकर-सौरव गांगुली

5992  कुमार संगकारा- महेला जयवर्धने

5475 तिलकरत्ने दिलशान – कुमार संगकारा

5462 सनथ जयसूर्या – मर्वन अटापट्टू

5409 एडम गिलक्रिस्ट- मैथ्यू हेडन

5206 ग्रॉर्डन ग्रीनिज- डेसमंड हेन्स

5023 रोहित शर्मा – शिखर धवन

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!