Share

पांड्याच्या ‘या’ चुकीमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला

Published On: 

पुणे : इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेचा शेवटचा सामना हा आखेरच्या षटकापर्यंत चालला. मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्यासाठी हार्दिक पांड्याची एक चुक कारणीभूत ठरली. हार्दिकने केलेल्या एका चुकीमुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यत रंगला.

या सामन्यात इंग्लंडच्या सॅम करनने झुंजार खेळी केली. सॅम करनने या सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी केली. करनने दिलेल्या झुंजीमुळे सामना आखेरच्या षटकापर्यंत रंगला. सॅमने केलेल्या फलंदाजीने इंग्लंडच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या आशा जीवंत ठेवणाऱ्या सॅम करनला जिवदान दिले ते भारताच्या हार्दिक पांड्याने आणि तेही २२ धावावर.

सामन्याच्या ३४व्या षटकांत भारताचा युवा गोलंदाज प्रसिध कृष्णन गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडुवर सॅम करनने एक फटका खेळला. चेंडुच्या दिशेने धावणाऱ्या हार्दिक पांड्या धावत होता. त्याने चेंडु पकडला सुद्ध मात्र धावताना पकडलेला चेंडु हवेत उडाला आणि खाली पडून सिमारेषेच्या बाहेर गेला. जर हार्दिकने हा चेंडु पकडला असता तर सॅम करन हा फक्त २२ धावावर माघारी परतला आसता आणि सामना शेवटच्या षटकांपर्यंत गेलाच नसता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!