टीम महाराष्ट्र देशा – राज्य सरकारच्या जाहिरातीत बँकॉकच्या रस्त्याचा फोटो दर्शवला गेला असल्याने गुजरात, मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही विकास वेडा झाला आहे. अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीये.
राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून कोट्यवधी रूपयांच्या जाहिराती सुरू आहेत. ‘मी लाभार्थी, होय हे माझं सरकार’ अशा टॅगलाईन वापरून या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या अशाच एका जाहिरातीत चक्क बँकॉकमधील फोटो वापरण्यात आला आहे. राज्यातील रस्त्यांची दुरावस्था पाहता, जाहिरातीमधील रस्ता महाराष्ट्रात कुठे दिसत नाही. त्यामुळे बँकॉकच महाराष्ट्रात आले आहे, असे सांगायला हे फसवणीस सरकार कमी करणार नाही असा टोलाही सावंत यांनी लगावला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

