Share

अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीला जोडणा-या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी- गडकरी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीला जोडणा-या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीत दिली.
रविवारी गडकरी यांनी माध्यान्ह आरतीला हजेरी लावत मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी यावेळी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, साई शताब्दीनिमित्त देश-विदेशातील भाविक येतील. देशातील शेतकरी, मजूर, जनता सुख-समृद्धीने नांदावी, अशी साईचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारने शिर्डीत विमानतळ उभारल्याने साई भक्तांची गैरसोय दूर झाली, असेही गडकरी म्हणाले.

गडकरी यांनी साईनाथ रक्तपेढीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली. संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगरसेवक शिवाजी गोंदकर, डॉ. राजेंद्र पिपाडा, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार माणिक आहेर आदी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!