Share

हा असेल जम्मू – काश्मीरच्या विकासाचा पर्याय ;भाजपने दिले उत्तर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- जम्मू – काश्मीरच्या स्वायत्ततेच्या अतिशय संवेदनशील विषयावर भाजपनं आपलं मत मांडलंय.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० हटवणं हाच काश्मीरच्या गेल्या कित्येक दशकांपासूनच्या समस्येचा व्यावहारिक उपाय असू शकतो, असं भाजपनं म्हटलंय.

भाजपचे प्रवक्ते वीरेंद्र गुप्ता यांनी, जम्मू-काश्मीरला अन्य राज्यांच्या बरोबरीनं आणण्यासाठी कलम ३७० हटवणं हा एकच पर्याय असू शकतो, असं म्हटलंय. दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या फुटीरतावद्यांना आणि पाकिस्तानसाठी हेच सडेतोड प्रत्यूत्तर असेल… तसंच हाच जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यातील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग असेल असंही गुप्ता यांनी म्हटलंय.

जम्मू-काश्मीरसोबत वेगळा व्यवहार करणं, राज्याला वेगळं संविधान बनवण्याची परवानगी देणं आणि भारतीय संविधानत कलम ३७० लागू करणं हेच जम्मू-काश्मीरच्या सध्याच्या समस्येचं मूळ कारणं आहे, असंही गुप्ता यांनी म्हटलंय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!