टीम महाराष्ट्र देशा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचेही समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असे विनंतीही केले आहे.
काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील ‘आऊटसोर्सिंग’मध्ये आरक्षण दिल्यानंतर नितीश यांनी या दिशेने आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नितीश यांनी उचलले हे पाऊल राजकारणासाठी असल्याचीही चर्चा सुरू आहे. शिवाय, संसदेच्या पुढील सत्रात खासगी कंपन्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा करण्याची त्यांनी सर्व पक्षांकडे मागणी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
