Share

ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा-  राज्यात ऊस दारावरून राजकारण भलतच तापल आहे. अनेक शेतकरी संघटना ऊसाला चांगला भाव मिळावा याकरता प्रयत्नशील आहेत , शेतकरी संघटना बरोबरच आता  केंद्रीय कृषिमूल्य आयोग देखील शेतकऱ्यांच्या मदतीस धावून आला आहे . राज्याच्या ऊस पट्ट्यात यंदाचा गाळप हंगाम सुरु होणार असतानाच आता एफआरपीमध्ये 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.

साधारणत: बाजारपेठेतील साखरेच्या दराचा ठोकताळा बांधूनच हा दर ठरविला जातो. २०१५-१६ च्या हंगामामध्ये ९.५ टक्के साखर उताऱ्याला २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २४८ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आता एफआरपीमध्ये यंदाही ही वाढ होणार असल्यानं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

९.५ टक्के साखर उताऱ्याला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्यानं एफआरपीची रक्कम ही आता 3 हजार रुपयांच्या पुढं जाणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर व साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालून उसाची एफआरपी निश्चित करण्याचं काम केंद्रीय कृषिमूल्य आयोग करतं.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!