Share

भाजपविरोधात वातावरण तापवा शिवसेना भवनातून कार्यकर्त्यांना आदेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात वातावरण तापवा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेकडून भाजपविरोधी रणनिती संदर्भात पुस्तिकेचे वाटप करण्यात आलेय.

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर काय भूमिका घ्यायची याबाबत शिवसेनेची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनाभवानात ही बैठक पार पडली.

या बैठकीला आदित्य ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, दिवाकर रावते, सुभाष देसाई उपस्थित होते. याखेरीज पक्षाचे नेते, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखही बैठकीला उपस्थित होते. नारायण राणेंचा मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरुन शिवसेना नाराज आहे.

फडणवीस सरकारची त्रिवर्षपूर्ती आणि मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जातेय.

शेतकऱ्यांना घोषित झालेल्या कर्जमाफीच्या सद्यस्थितीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आलाय. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाची चर्चा झाल्याची माहिती झालेय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!