Share

ट्रेन लेट झाली तर मिळणार तिकीटाचे पैसे परत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा-ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा आली तर आता ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांनाही त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. याआधी ही सुविधा फक्त तिकीट खिडकीवरून तिकीट काढणाऱ्यांनाच मिळत होती. ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांसाठीच्या नियमांमध्ये रेल्वेकडून बदल करण्यात येणार आहेत.

ट्रेनला तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यावर प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट रद्द केलं तर तिकीटाचे अर्धे पैसे प्रवाशांना लगेचच परत मिळणार आहेत. उरलेली ५० टक्के रक्कम प्रवाशाच्या प्रवासाची माहिती मिळाल्यावर मिळेल. ई-तिकीटचे पैसे परत मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या टीडीआर ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे.

टीडीआर ऑप्शन सिलेक्ट केल्यावर प्रवाशाला त्याच्या तिकीटाचा पीएनआर नंबर आणि यात्रेबद्दलची अन्य माहितीचा फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यावर बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज प्रवाशाला मोबाईलवर येईल. तसंच तुमच्या रजिस्टर ई-मेल आयडीवरही याबाबतचा एक मेल येईल.

IRCTCकडून तिकीट बूकिंग करतानाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. IRCTC वर तिकीट बूक करताना प्रवाशांना त्यांची राष्ट्रीयता विचारण्यात येणार आहे. फॉर्म भरताना राष्ट्रीयता टाकली नाही तर तिकीट बूक करता येणार नाही. तसंच वरिष्ठ नागरिक असलेल्यांना तिकीटामध्ये सूट नाकारता येण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसंच वरिष्ठ नागरिकांना तिकीटामध्ये किती सूट हवी आहे याचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. तिकीट रिजर्वेशन करताना पुरुष आणि महिलांसोबतच किन्नरांचा पर्यायही देण्यात आला आहे. रेल्वे बोर्डानं या नव्या नियमांबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे लवकरच रेल्वे तिकीट बूक करताना हे नवे नियम लागू होतील.

ऑनलाईन तिकीट बूक करताना सगळ्या बँकांची डेबिट आणि क्रेडिट कार्ड चालणार आहेत, असं आयआरसीटीसीनं सांगितलं आहे. रेल्वे तिकीट बूक करताना आयसीआयसीआय, एसबीआय सारख्या ६ बँकांची कार्ड वापरता येणार नाहीत. तिकीट बूक करण्यासाठी इंडियन ओव्हरसिज बँक, कॅनरा बँक, युनायटेड बँक, इंडियन बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक या बँकांची कार्ड चालतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आयआरसीटीसीनं स्पष्ट केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!