Share

नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी…..- चिदंबरम

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा -देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

चिदंबरम यांनी व्यापारी आणि व्यावसायिकांशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, २००४ ते २००९ या कालावधीत ८.५ टक्क्यांवर पोहोचलेल्या विकासदरात २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. देशात आलेल्या मंदीसदृश्य वातावरणाला प्रामुख्याने नोटबंदीचा निर्णय कारणीभूत आहे. चिदंबरम म्हणाले, विद्यमान अर्थमंत्री अरूण जेटली सांगतात की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थानावर आहे. तर, मग सरकारला बॅंकांचे भांडवलीकरण का करावे लागत आहे. प्रत्यक्षात देशात मंदीचे वातावरण आहे. आणि त्याला नोटबंदीचा निर्णय कारणीभूत आहे. नोटबंदीमुळे कोणत्याही प्रकारचा काळा पैसा सरकारला शोधता आला नाही. दोश आजूनही नोटबंदीच्या तडाख्यातून सावरला नाही.

नोटबंदीच्या निर्णयातून देश स्वत:ला सावरू पाहात होता. तोपर्यंत सरकारने जीएसटीचा दणका दिला. त्यामुळे जनता, उद्योग, व्यवसाय, व्यापारी, गुंतवणूकदार यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. जीएसटी वाईट नाही. पण, जीएसटीसोबत जो कायदा करण्यात आला आहे. तो वाईट असल्याची टीपण्णीही चिदंबरम यांनी या वेळी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!