Share

राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा

Published On: 

मुंबई दि.५ सप्टेंबर – भाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात आज मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विदया चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींच्यावतीने भाजप आमदार राम कदम यांच्या घरासमोर जोरदार घोषणा देत आणि त्यांच्या अटकेची मागणी करत राष्ट्रवादीच्या रणरागिणींनी चांगलाच इंगा दाखवला.

भाजप आमदार ‘रावण’ कदम यांच्या फोटोला काळं फासत आणि चपलांचा मारा करत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान आमदार राम कदम यांच्याविरोधात पोलिस केस दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या आंदोलनामध्ये आमदार विदया चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई समन्वयक मनिषा तुपे, जिल्हाध्यक्षा पुष्पा हरियन, डॉ.सुरैना मल्होत्रा, आरती साळवी, बिलकिश शेख, डॉ.रिना मोकल, स्वाती माने आदींसह असंख्य महिला, युवती सहभागी झाल्या होत्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!