Share

यांना करायचे काहीच नाही फक्त प्रश्न विचारायचे असतात- मोदी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – कधीकाळी वर्ल्ड बॅंक चालवणारे लोक इथे बसायचे, मी तर अद्याप वर्ल्ड बॅंकची बिल्डींगही पाहीली नसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.१४२ वरुन भारत हा १०० व्या स्थानावर पोहोचला ही गोष्ट कोणाच्या लक्षात येत नसल्याचे सांगत टीका करणाऱ्या विरोधकांवर मोदींनी निशाणा साधला आहे.

रॅंकिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी एकत्र मिळून काम करण्याची गरज असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. यांना करायचे काहीच नाही फक्त प्रश्न विचारायचे असतात. मी असा पंतप्रधान आहे ज्याने अजून वर्ल्ड बॅंकेची बिल्डींगही पाहिली नाही परंतु वर्ल्ड बॅंक चालविणारी माणसे इथे बसली आहेत असे विधानही त्यांनी यावेळी केले.

गेल्या तीन वर्षांपासून सरकार कारभार सुलभ, व्यवस्थित चालण्यासाठी काही निर्णय घेत आहे. जीएसटीदेखील याचेच एक पाऊल आहे. यात दोष असतील तर सोडविण्यासाठी मार्ग सुचविणे गरजेचे आहे. सर्व सर्वांची ताकद लागली तर काम उत्तम होईल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!