🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या शानदार विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित चर्चेत आहे. पण, मोहम्मद कैफने त्याच्यासाठी केलेले एक ट्विट अडचणीचे ठरले आहे. एकीकडे सर्वजण रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्वाखाली एकामागून एक विजय नोंदवणाऱ्या टीम इंडियाचे कौतुक करत असतानाच कैफच्या वक्तव्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला आता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
झाले असे की, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (mohmmad kaif) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांना मालिका जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. पण, त्याच्या ट्विटमध्ये त्याने रोहित शर्मा (rohit sharma) आणि नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे (rahul dravid) खूप कौतुक केले, ज्यात त्याने हा संघ घडवण्याचे पूर्ण श्रेय रोहित आणि द्रविडला दिले. जे चाहत्यांना अजिबात आवडले नाही. त्यामुळे त्याला ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले आहे.
KL, Rohit, Vihari, Kohli, Iyer, Pant, Jadeja, Ash, Bumrah, Shami and many No.11 options … Suddenly, it all looks fine. Under Rohit and Dravid, a world beating Test unit is taking shape.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) March 15, 2022
https://twitter.com/14_aryanp/status/1503645275281584130?s=20&t=Cxrzo9MyWTSIYRBjLaWhKQ
https://twitter.com/kohlifan100/status/1503645273389559808?s=20&t=6rGHlrx_VTxb6bqnJAULTQ
Current Test team has been made by Virat Kohli , Ravi Shastri.
From Vihari to Axar , everyone first played under Virat Kohli.
Don't come with favouritism.
— DK (@ViratCrazyDK) March 15, 2022
Lmao Kaif yaar kya Nasha hai ye? This was the same team since few years except we had pujara and Rahane..and even though those two had not been as good as they used to be we won games. What is this bad bad bad cricket take.
Or you're another hater of certain cricketer like others— Archer (@poserarcher) March 15, 2022
मोहम्मद कैफने हे ट्विट करताच यूजर्सनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला लक्ष्य केले आहे. ट्विटमध्ये कैफने रवी शास्त्री आणि विराटने बनवलेल्या या संघाचे श्रेय द्रविड आणि रोहितला दिल्याबद्दल चाहत्यांनी या प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाणी प्रश्नी आग्रही भुमिका मांडणारे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
- IPL 2022: बायो बबल तोडणाऱ्यासाठी बीसीसीआयचा कठोर शिक्षेचा निर्णय , दंडासह लागू शकते बंदी
- “मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील…”, महामंडलेश्वर स्वामींची भविष्यवाणी
- शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; सरकारचे मोठे धोरण!
- नारायण राणे आणि नितेश राणेंना जामीन; दिशा सॅलियन प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
