Share

मर्सल’ चित्रपट केवळ एक काल्पनिक कथा ; चित्रपटाला न्यायालयाचा हिरवा कंदील

Published On: 

🕒 1 min read

वेब टीम -मर्सल’ चित्रपट केवळ एक काल्पनिक कथा असून भारतात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट करत मद्रास हायकोर्टाने चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा दिला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘मर्सल’ या चित्रपटातील संवाद राजकीय वादाचा विषय ठरला होता. मात्र, आता न्यायालयानेच ‘मर्सल’ला हिरवा कंदील दिला आहे. ‘मर्सल हा फक्त एक चित्रपट असून वास्तविक जीवनाशी त्याचा काहीच संबंध नाही’, असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांसाठी एकसारखेच असावे, हा मुद्दाही न्यायालयाने अधोरेखित केला.

न्यायालयानेही चित्रपटाच्याच बाजूने निर्णय दिला. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजयची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनीही पाठिंबा दिला होता. ‘मर्सल’मधून एका महत्त्वाच्या विषयाची प्रभावीपणे मांडणी करण्यात आल्याचे म्हणत त्यांनी मर्सलची प्रशंसा करणारे ट्विट केले होते.

मात्र, या सगळ्या वादाचा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच फायदा होत आहे.‘मर्सल’मधून जीएसटी तसेच डिजीटल इंडिया या मुद्द्यांवर नकारात्मक भाष्य करण्यात आल्यामुळे भाजपने या चित्रपटाचा विरोध करणे सुरुच ठेवले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे भाजप सरकारच्या धोरणांविषयी गैरसमज निर्माण होत असल्याचे कारण देत हा विरोध करण्यात येत आहे. सध्या ‘मर्सल’च्या मुद्द्यावरुन बऱ्याच गोष्टींना हवा मिळाली असून शेवटी हा वाद न्यायालयापर्यंत गेला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!