टीम महाराष्ट्र देशा-‘मन की बात’ च्या ३७ व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. छठ पर्व हा शुद्धीचा पर्व असल्याचे ते म्हणाले. आज त्यांनी ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हा नवा नारा दिला. जवानांबरोबर दिवाळी साजरी करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगत जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्यांचा अनुभव सर्वांनी जरूर जाणून घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, आपले जवान फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत. आपले जवान दुर्गम भागात जातात. यात अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

