Share

राज्यातील 17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 व 13 डिसेंबरला मतदान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विविध 17 नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज, मंगळवारी केली.यावेळी सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर,तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी;तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबर रोजी मतदान होईल.

नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर होणार आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!