टीम महाराष्ट्र देशा- मुंबईत माहीममध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राडा झाला. भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेची 190 क्रमांकाची शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.शीतल गंभीर यांनी भाजपचा नाम फलक असलेला बोर्ड शिवसेना शाखेवर लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी भाजपचा बोर्ड शिवसैनिकांनी तोडून टाकला.
शीतल गंभीर यांचे वडील सुरेश गंभीर शिवसेनेचे पदाधिकारी होते. यामुळे शीतल गंभीर यांनी ह्या शाखेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

