Share

नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी ही मोठी चूक होती हे मान्य करावे …- मनमोहन सिंह

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – नोटाबंदीला 8 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अहमदाबादमध्ये सभा घेऊन, सरकारवर हल्लोबल केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी ही मोठी चूक होती हे मान्य करुन, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं, असं मनमोहन सिंह सोमवारी म्हणाले होते. तसंच नोटाबंदी म्हणजे ब्लंडर अर्थात विनाशकारी आर्थिक निती असल्याचंही सिंह म्हणाले होते.

नोटाबंदी ही सरकारची मोठी चूक होती. नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट आहे, असं मनमोहन सिंह म्हणाले.“नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकांचा कणाच मोडला आहे. देशात टॅक्स टेररिझमसारखी अवस्था आहे. कररुपी दहशतीमुळे भारतीय व्यवसायांतील गुंतवणुकीत घट झाली आहे”, असा दावा मनमोहन सिंह यांनी केला.नोटाबंदीचा उद्देश साध्य झालाच नाही, काळा पैसेवाल्यांना पकडलंच नाही. मात्र त्याचा सर्वाधिक फटका छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना बसला आहे, असंही मनमोहन सिंह म्हणाले.यानंतर त्यांनी आज पुन्हा अहमदाबादेत सभा घेऊन सरकारचं अपयश उघडं पाडलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!