Share

ज्यांच्या पत्नी दररोज शौहर बदलतात, त्यांच्यासाठी जौहरची कल्पना अवघड ; भाजपा खासदाराची जीभ घसरली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  मध्य प्रदेशच्या उज्जैनचे खासदार असलेल्या चिंतामणी मालवीय यांनी ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. ‘थोड्याफार पैशांसाठी इतिहासाची मोडतोड करुन चित्रपटाची निर्मिती करणे अतिशय लज्जास्पद आहे. ही बाब अतिशय चीड आणणारी आहे. इतिहासाची केली जाणारी मोडतोड कदापि सहन केली जाणार नाही,’ असा इशारा मालवीय यांनी दिला आहे.चित्रपटावर टीका करताना भाजप खासदार चिंतामणी मालवीय यांनी पातळी सोडली आहे. ‘चित्रपटसृष्टीतील लोक आज एका पत्नीला सोडून उद्या दुसरीकडे जातात. ज्यांच्या पत्नी दररोज शौहर बदलतात, त्यांच्यासाठी जौहरची कल्पना अवघड आहे,’ असे वादग्रस्त विधान मालवीय यांनी केले आहे.

याशिवाय ‘भन्साळीसारख्या लोकांना दुसरी कोणतीही भाषा समजत नाही. त्यांना फक्त चपलांची भाषा समजते,’ असेही मालवीय यांनी म्हटले. लोकांनी हा चित्रपट पाहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.‘पद्मावती’ चित्रपटाला होत असलेला विरोध काही शमताना दिसत नाही. कर्णी सेना, राजपूत संघटना यांनी या चित्रपटाला विरोध केल्यानंतर आता भाजपच्या खासदाराने लोकांना हा चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले आहे.

‘अलाउद्दीन खिल्जीच्या दरबारातील कवींनी लिहिलेल्या चुकीच्या इतिहासावर संजय लीला भन्साळींनी चित्रपट तयार केला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ चुकीचा नसून तो अतिशय निंदनीय आहे. अभिव्यक्तीच्या नावाखाली भन्साळींची मानसिक विकृती सहन केली जाणार नाही,’ असेही ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!