🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क: राज्यातील सत्तानाट्य थांबायचं नाव घेत नाही आहे. यातच आता ‘मी पुन्हा येईन‘ हा डायलॉग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आहे एका जबरदस्त वेबसिरीजचं. ‘रानबाजार’ आणि ‘अनुराधा’ या वेबसिरीजच्या घवघवीत यशानंतर ‘प्लॅनेट मराठी’ घेऊन येत आहे एक नवी वेबसिरीज. ‘खुर्ची’साठी सुरु असलेला सत्तासंघर्ष आपण खऱ्या आयुष्यात अनुभवतच आहोत. अशाच काल्पनिक राजकीय कथेवर आधारित ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी ही वेबसिरीज लिहिली असून या वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून या वेबसिरीजचा टीझर शेयर केला आहे. त्याबरोबर लिहलेल्या कॅप्शनमध्ये अरविंद जगताप म्हणतात कि, मी पुन्हा येईन. मागच्या वर्षी जुलैमध्ये मी पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून केलेली ही सिरीज. याचा वास्तवाशी संबंध नाही. कारण लेखक दिग्दर्शक म्हणून आपण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीवर पोचणं अशक्य आहे. हे एका सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलेलं राजकारण. राजकारणात काही खरं नाही हेच खरं आहे, हे हसत खेळत सांगणारी “मी पुन्हा येईन”. याच महिन्यात प्लॅनेट मराठीवर.
https://www.instagram.com/reel/Cf4MLgLqW3X/?utm_source=ig_web_copy_link
या टीझरवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सची बरसात केली आहे. जबरदस्त डायलॉग आणि उत्तम अभिनयाची पर्वणी या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे ही सिरीज पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या वेबसिरीजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भरत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, दिप्ती क्षीरसागर आणि सीमा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
