Share

अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

Published On: 

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे १६ वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली. ‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

पण पडळकर यांना हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात. अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण प्रकरणी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. जेजुरी पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन व पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!