Share

आदित्य ठाकरेंच्या नावाने सरकारी योजना; मागासवर्गीय युवकांना मिळणार प्रशिक्षण

Published On: 

औरंगाबाद : एखादी नवी योजना सुरू करायची असल्यास तिला एखाद्या वरिष्ठ राजकीय नेत्याचे किंवा महामानावांची नावे देण्यात येतात. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेने एका योजनेला अवघे ३१ वर्ष वय असलेले राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव दिले आहे. ‘आदित्य ठाकरे युवा चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण योजना’ असे या योजनेचे नाव आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने ग्रामीण भागातील मागासवर्गीय युवकांना चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण मिळावे. तसेच, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने एक योजना सर्वसाधारण सभेत सादर केली. त्याला ‘आदित्य ठाकरे युवा चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

या योजनेसाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किमान दहावी नापास किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय युवकांनी चारचाकी वाहनचालक परवाना काढण्यासाठी लागणारे शुल्क आणि एका महिन्याचा निवासी भत्ता यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!