🕒 1 min read
पुणे : गेल्या दोन चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात होत असलेल्या अवकाळी पावसामुळं कोकणातील आंबा आणि नाशिकच्या द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे .
कोकणातील हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या बाजारात दाखल झाली असली तरी सध्याच्या ढगाळ हवामानाचा फटका आंब्याच्या मोहोरावर झाला असून यंदा आंबा उशिरा बाजारात दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे .
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही कोल्हापूर, नगर आणि सातारा जिह्यांच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली आहेत.
यासह द्राक्षबागा, स्ट्रॉबेरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जावळी तालुक्यातील सोनगाव, सर्जापूर येथे ज्वारीसह अन्य पिकांना फटका बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँकेसमोर दुचाकी पार्क करताय.. सावधान! गाडी चोरीला जाऊ शकते!
- #भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार
- #भंडारा दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करा- आठवले
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

