🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु युनिट ला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यु झाल्याची मन विदीर्ण करणारी दुःखद घटना घडली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. राज्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी शासनाने दक्षता घ्यावी त्यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजात अर्भकांच्या पालकांना सांत्वनपर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालय अग्निकांडात दहा नवजात बालकांचा मृत्यू होणे ही काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत दुःखद घटना आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच या दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून दक्षता घ्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- #भंडारा दुर्घटना : कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये : रितेश देशमुख
- #भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार
- भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेने राहुल गांधी हळहळले
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

