🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून पुन्हा पाच दुचाकी लंपास करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. बँकेच्या पार्किंग देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सेवानिवृत्त निर्दोष जयकुमार परतवार (५८, रा. आयनॉक्स तापडीयाच्या पाठीमागे, सेक्टर टाऊन सेंटर सी-३) हे ४ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास कॅनॉट प्लेस भागातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी (एमएच-२०-डीएक्स-८१०९) बँकेच्या गेटसमोर उभी केली होती. बँकेतील काम झाल्यावर दुपारी अडीचच्या सुमारास ते बाहेर आले. तोपर्यंत चोराने दुचाकी लांबवली होती.
तर आणखी एक दुचाकी चोरीचा प्रकार अदालत रोडवरील आयसीआयसीआय बँकेसमोर घडला. इमरान खान हुसेन खान (२८, रा. पटेलनगर, नारेगाव) हे ५ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास अदालत रोडसमोरील आयसीआयसीआय बँकेत कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी (एमएच-२०-सीसी-४२२३) बँकेसमोरील पार्किंगमध्ये उभी होती. चोराने संधी साधून अवघ्या अर्ध्या तासात त्यांची दुचाकी लंपास केली.
उस्मानपुरा भागातील गोपाल टी जवळून देखील एक दुचाकी चोरीला गेली. शेतकरी अमजद उस्मान पठाण (४२, रा. बालानगर, ता. पैठण) हे ५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात आले होते. त्यांनी गोपाल टी जवळ त्यांची दुचाकी (एमएच-२०-एफजे-७७१०) उभी केली होती. कामानिमित्त ते बाहेर गेल्याचे पाहून चोराने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लांबवली.
तर शहागंज भागातील बनेमिया दर्गा परिसरात घडली. सय्यद समीर सय्यद युसूफ (नारेगाव) यांनी ६ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास शहागंजातील हॉटेल जमजम समोरील बनेमिया दर्गाजवळ दुचाकी (एमएच-२०-ईव्ही-०३९३) उभी केली होती. त्यांची दुचाकी पाऊण तासाच्या अंतरावर चोराने लांबवली. याशिवाय वाळुज, लांजी रोड येथील निसार हमीद पठाण (रा. लांजी रोड) यांनी ६ जानेवारी रोजी घरासमोर दुचाकी (एमएच-२०-एफडी-९१०१) उभी केली होती. चोराने मध्यरात्री त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली.
महत्वाच्या बातम्या
- मुस्लिमही मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही, मग शहराचे नाव औरंगाबाद का? आ. दानवे यांचा सवाल
- ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, तिसऱ्या दिवसाखेर 197 धावांची आघाडी
- #भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार
- जाणून घ्या भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना कशी घडली ?
- #भंडारा : मी तिथे उपस्थित नसलो तरी आपण सर्व एकत्र आहोत; ठाकरेंनी व्यक्त केली हळहळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

