🕒 1 min read
भंडारा :- महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भंडारा दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, दगावदेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, आरोप होत आहेत विरोधकांकडून त्यातले तथ्य तपासून पाहू, दोषींना कडक शासन करणार असून मुलाहिजा ठेवणार नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ‘भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खदायक आणि व्यथित करणारी आहे. या घटेनमध्ये बळी ठरलेल्या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या घटनेची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- #भंडारा दुर्घटना : कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये : रितेश देशमुख
- मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक
- भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेने राहुल गांधी हळहळले
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

