🕒 1 min read
भंडारा :- महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत.
या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
#भंडारा येथील नवजात अर्भकांच्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी. मृत बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत. घटनेची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई करणार.भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल-आरोग्यमंत्री @rajeshtope11 pic.twitter.com/LZ8CR4LjSr
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 9, 2021
दरम्यान, या घटनेवर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भंडारा येथील नवजात अर्भकांच्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे . मृत बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत केली जाईल. घटनेची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई करणार.भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
- मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक
- भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेने राहुल गांधी हळहळले
- भारतीय संघावरती दुखापतीच सावट; पंतसह जडेजा देखील मैदानाबाहेर
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

