🕒 1 min read
मुंबई : ईडीकडून राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईविषयी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे झाली आहेत व देशाला त्यापासून धोका आहे . महाराष्ट्रासारख्या राज्याची बदनामी करण्यासाठी हे शिखंडी अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहेत, पण या शिखंडींच्याही कमरेला धोतर आहे व त्याचीही गाठ सुटू शकते हे त्यांनी विसरू नये, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘विरोधात बोलणाऱ्यांचे संबंध दाऊदशी जोडायचे, मनी लॉण्डरिंगची खोटी प्रकरणे बनवायची, त्यांची यथेच्छ बदनामी करायची हेच सुरू आहे. कारण हे करणाऱ्यांच्या मनगटात ताकद नाही, दंडावरील बेडक्यांत जोर नाही. शिखंडीला पुढे करून युद्ध करायचे. हिंमत असेल तर निधडय़ा छातीने पुढे या. आहे हिंमत?’, असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळय़ांना माहीत आहे, पण भाजपनेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
“…मग आम्ही धुणीभांडी करायची का?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना टोला
-
“त्याने अजूनही माफी मागितली नाही”; रिद्धीमान साहाचा धमकी देणाऱ्या पत्रकारावर नवा खुलासा
-
“लोकांनी तुम्हाला बुडवण्याचा निश्चय केला असेल तर..”, भातखळ करांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
-
…तेव्हा महाआघाडीतील नेते एकदम चिडीचूप गप्प बसले होते- केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
