Share

…तोपर्यंत कोरोनापासून कुणीही सुरक्षित असणार नाही – आदित्य ठाकरे

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातले होते. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला असून सर्वाधिक कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून अद्यापही कोरोना रोगाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात येत नसतानाच विविध संकटांनी राज्याच्या चिंतेत भर घातली आहे. दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यावरून राज्य सरकारने स्थानिक प्रशासनांना आता पासूनच खबरदारीचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका आणि एच एन रिलायन्स फाऊंडेशनच्या सौजन्यानं मुंबईत दीड लाख नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वरळी कोळीवाडा येथे आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी संभाव्य धोक्यापासून नागरिकांना सावध केलं आहे.

‘सर्व नागरिकांचं कोविड १९ लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईची लोकसंख्या विचारात घेता इथं लसीकरणाचा वेग वाढविणं आवश्यक आहे. यासाठी मुंबई महापालिकेसोबत सातत्यानं आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्र हे एक कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणारं राज्य आहे. तथापि इतरही राज्यांमध्ये लसीकरण पूर्ण होणं आवश्यक आहे. ते होत नाही, तोपर्यंत कुणीही सुरक्षित असणार नाही,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘लसीकरणाच्या मोहिमेत खासगी रुग्णालये आणि कंपन्यांच्या सीएसआर निधीचा उपयोग करून लसीकरण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार रिलायन्स फाऊंडेशन स्वतःहून पुढं आलं आहे. त्यांच्या सहकार्यानं ही मोहीम राबविली जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. लसीकरणाशिवाय या आजाराचा धोका कमी होणार नाही.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!