Share

भाजपच्या नेत्यांनी ‘आयआयएम’ पळवल्याबद्दलही बोलावे, आमदार दानवेंचा बोराळकरांवर पलटवार

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यात होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्यात आले आहे. यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षातील वरीष्ठ नेत्यांशी भांडायला हवे, असे मत भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केले होते. यावरुन शिवसेना प्रवक्ते जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी बोराळकर यांच्यावर पलटवार केला आहे. भाजपच्या नेत्यांनी आयआयएम पळवल्याबद्दलही बोलावे, असे आव्हान त्यांनी बोराळकर यांना दिले आहे.

या संदर्भात आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, ‘भाजपच्या मंडळींनी #संभाजीनगर येथून त्यांच्या नेत्यांनी आयआयएम विदर्भात पळवल्याबद्दल पण बोलावे! स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर देणार होतात, त्याचं काय झालं, ते पण सांगा जरा.’

औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ मंजूर करण्यात आले होते. मात्र, आता हे विद्यापीठ पुण्यात होणार आहे. यावरुनच महाविकास आघाडी विरुद्ध विरोधक असा वाद पाहायला मिळत आहे. याच मुद्यावरुन भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांवर टीका केली होती. त्याला आमदार दानवे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!