Share

‘पुण्यातील निर्बंध देखील शिथिल करा, तातडीने आदेश काढा’; महापौर मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केली. यानुसार २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्यात आले. तर कोरोना स्थिती लक्षात घेता ११ जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता लेवल ३ चे निर्बंध कायम ठेवले आहेत. यासोबतच, गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील, असं टोपे यांनी सांगितलं. या ११ जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेते आणि व्यापारी यांनी केली आहे. दरम्यान, आज सांगली दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असे सांगितले.

यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याला देखील निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी अशी मागणी केली आहे. ‘पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांच्या खाली आहे, त्यामुळे शहर लेव्हल 2 मध्ये आहे, तरी शिथीलता दिली जात नाही. पुणे शहरात शिथीलता (Pune) देण्यासंदर्भात मी गेल्या 15 दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करतोय, मात्र त्यावर निर्णय का नाही माहीत नाही,’ अशी सल मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

यासोबतच, ‘ राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे शहरातील लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे,’ असं देखोल मोहोळ यांनी म्हटलं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिक हे लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत असतानाच लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मंदावले आहे. यामुळे तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा –

‘पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून सरकारनं ऐकलं नाही, तर बुधवारपासून दुपारी ४ नंतरही दुकानं सुरु ठेऊ, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून व्यापाऱ्यांना जरी अटक केली, तरी आम्ही मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या फतेचंद रांका यांनी जाहीर केली आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अन्यथा आम्ही ती उघडी ठेऊ, असं देखील महासंघातर्फे सांगण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!