जालना : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधक महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा सर्वोपरी प्रयत्न करतांना दिसत होते. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करून सरकारनेच विरोधकांना झटका दिला आहे.
सभागृहात बोलू दिलं जातं नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. असा आरोप करत दुसऱ्या दिवशी सभागृह कामकाजाचा त्याग करत विरोधी पक्षांने बाहेर पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरू केलं. पण मार्शल पाठवून त्यांना हुसकावून लावण्यात आले. यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी विरोधात विधान भवनच्या परिसरात अभिरूप विधानसभा सुरू केली.
विधानभवनातील परिसरातील पत्रकारांवर मार्शल पाठवून कारवाई. कॅमेरे हिसकावून घ्यायचा प्रयत्न काल सरकारविरोधात बोलणाऱ्या १२ आमदार निलंबित आज पत्रकारांवर कारवाई
महाराष्ट्रात अभूतपूर्व #आणीबाणी https://t.co/dkV3KXjM62— Babanrao Lonikar (@BabanraoLonikar) July 6, 2021
यात आता महाविकास आघाडी सरकारवर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी ही राज्यात अभूतपूर्व ‘आणीबाणी’ असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘विधानभवनातील परिसरातील पत्रकारांवर मार्शल पाठवून कारवाई. कॅमेरे हिसकावून घ्यायचा प्रयत्न. काल सरकारविरोधात बोलणाऱ्या १२ आमदार निलंबित, आज पत्रकारांवर कारवाई, महाराष्ट्रात अभूतपूर्व आणीबाणी.’
महत्त्वाच्या बातम्या
- श्वेता तिवारीचा पती अभिनवने ‘या’ कारणामुळे घेतली कोर्टात धाव
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- राज्यपालांच्या नेमणुका करताना सोशल इंजिनिअरिंगवर मोदी सरकारकडून दिले जातेय विशेष लक्ष
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका


