मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहे. मुलगा रेयांश याच्यावरून तिचा दुसरा पती अभिनव कोहली आणि तिच्यात सतत वाद होत आहेत. अभिनवनं श्वेता मुलाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या या कौटुंबिक वादाची सध्या चांगलीच चर्चा होती. आता अभिनवने श्वेताचा अंतरिम जामीन रद्द व्हावा यासाठी मागणी केली आहे.
https://www.instagram.com/p/CPvXd8YtBJT/?utm_source=ig_web_copy_link
अभिनव कोहली मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी कोर्टामध्ये केस लढत असून, बुधवारी या केसची सुनावणी आहे. एका मुलाखतीत अभिनव कोहलीच्या वकीलाने सांगितले की, श्वेता तिवारी कोर्टाला न सांगता आणि परवानगी न घेता, ‘खतरों के खिलाडी’च्या शुटींगसाठी साउथ आफ्रिकेला गेली होती. त्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली होती. आता श्वेताला याबद्दल जबाब द्यावा लागणार आहे.
श्वेता नुकतीच ‘खतरों के खिलाडी’च्या शूटींगवरून मुंबईला परतली आहे. या शोच्या शूटींगसाठी जवळपास दीड महिना ती साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये होती. श्वेता माझ्या मुलाला एकट्याला घरी सोडून केपटाऊनमध्ये मजा करत असल्याच म्हणत अभिनव कोहलीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर श्वेता तिवारीने देखील एक व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे अभिनव सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- राज्यपालांच्या नेमणुका करताना सोशल इंजिनिअरिंगवर मोदी सरकारकडून दिले जातेय विशेष लक्ष
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका
- विधीमंडळाच्या कामकाजात राजदंड एवढा महत्वाचा का असतो?


