नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए २.० सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी आठ राज्यात नवीन राज्यपालांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यपालांची संपूर्ण यादी पाहिली तर पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या राज्यपालांच्या निवडीमध्ये सर्व समुदायाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रथमच एससी-एसटी आणि ओबीसी समाजातून येणा-या नेत्यांची मोठ्या संख्येने राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे. सोबतच राज्यपालांच्या पदावरही मोठ्या संख्येने महिलांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली जाट समुदायाकडून तीन नेते सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत. अनुसूचित जातींमधील देखील काही नेते राज्यपाल पदावर कार्यरत आहेत. मोदींच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री असलेले थावरचंद्र गेहलोत यांचेही नाव आहे. गेहलोत हे भाजपमधील दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. गेहलोत यांच्यावर आता कर्नाटकच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मोदींच्या कार्यकाळातच आदिवासी समाजातील बरेच नेते गव्हर्नरही बनले आहेत. यापैकी मंगूभाई पटेल आता मध्य प्रदेशचे राज्यपाल असतील. पटेल हे गुजरातच्या राजकारणामध्ये आणि आदिवासी समाजातील एक मोठे नेते खूप अनुभवी आहेत. अनुसुइया उकेई छत्तीसगडच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
ओबीसी समुदायाच्या राज्यपालांची यादीही लहान नाही. लोनिया समुदायाशी संबंधित असलेले फागु चौहान सध्या बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल करण्यात आले आहे. हिमाचलमधील अल्प कालावधीनंतर बंडारू दत्तात्रेय यांना आता हरयाणाचे राज्यपाल केले गेले आहे. गंगा प्रसाद चौरसिया यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळसाई सौंदराराजन तेलंगणासह पुडुचेरीचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारत आहेत.
जाट समाजातील तीन राज्यपाल सध्या कार्यरत आहेत. पहिल्यांदाच जाट समाजातील तीन राज्यपाल वेगवेगळ्या राज्यात एकत्र काम करत आहेत. यापैकी जगदीप धनकर हे बंगालचे राज्यपाल आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. तर सत्यपाल मलिक हे मेघालयाचे राज्यपाल आहेत.
राज्यपाल पदावर दोन मुस्लिम विचारवंतही आहेत. त्यापैकी आरिफ मोहम्मद खान हे केरळचे राज्यपाल आहेत आणि नजमा हेपतुल्ला मणिपूरच्या राज्यपाल आहेत, ज्यांची अल्पसंख्याकातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये गणना केली जाते. दोन तेलुगु भाषिक समुदायांचे राज्यपाल देखील आहेत. बंडारू दत्तात्रेयानंतर हरी बाबू यांना राज्यपाल केले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका
- विधीमंडळाच्या कामकाजात राजदंड एवढा महत्वाचा का असतो?

